24.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जीवन सुरक्षा – आरोग्यवान भारत निर्माण या उपक्रमाचे उदघाटन
24.02.2026: आरोग्यसेवा क्षेत्रात ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या पी डी हिंदुजा हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या ‘जीवन सुरक्षा – आरोग्यवान भारत निर्माण’ या उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज महाराष्ट्र लोकभवन येथून करण्यात आले. यावेळी शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा देणाऱ्या ‘फिरत्या वैद्यकीय सेवा वाहनाला’ रवाना करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, हॉस्पिटलचे विश्वस्त तसेच डॉक्टर्स, तज्ज्ञ व निमंत्रित उपस्थित होते.