23.06.2021: जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना राज्यपालांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान
23.06.2021: डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड व दीप-कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजित मिश्र उपस्थित होते.