23.02.2025 : अमरावती विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांनी केले संबोधित

23.02.2025 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारंभास कुलगुरु डॉ मिलींद बारहाते, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र कुलगुरु डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ . नितीन कोळी, विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात राज्यपालांच्या हस्ते १० विद्यार्थ्याना पदवी प्रदान केली. राज्यपालांच्या हस्ते आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे तसेच रसायन प्रयोगशाळेचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले.