23.01.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

23.01.2025: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारोह विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाला.
दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना (अनुपस्थितीत) आणि राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या ३४६२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी राज्याचे कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, खडगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. विरेंद्र कुमार तिवारी, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्र मणि, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य व स्नातक उपस्थित होते