23.01.2021: राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान
23.01.2021: बांधकाम व्यवसाय, पायाभूत सुविधा, आदरातिथ्य, उद्योग, कला व समाजकारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील ३४ निवडक व्यक्ती आणि संस्थांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात आले. सहारा स्टार हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमात पुरस्कारार्थींचा कार्याचा उल्लेख असलेल्या ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अभिनेते सचिन पिळगावकर, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा उपस्थित होते.