22.08.2022 : अग्निपथ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

22.08.2022 : केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या ‘भारत के अग्निवीर’ या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. महंत रवींद्र पुरी क्रिएशन्स व सत्य ऑनलाईन प्रॉडक्शन द्वारे तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अध्यात्मिक गुरु डॉ राजेंद्र महाराज (अमृतवाणी सत्संग), निरंजनी आखाड्याचे महंत केशव पुरी, चित्रपटाचे निर्माते पुरुषोत्तम शर्मा व अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे प्रवक्ते अविक्षित रमण प्रामुख्याने उपस्थित होते.