22.08.2020 : राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक; राजभवन परिवारासोबत केली आरती

22.08.2020 : गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज संध्याकाळी राजभवन परिसर येथे विराजमान झालेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत उपस्थित राहून आरती केली. आरतीनंतर राज्यपाल गणरायापुढे नतमस्तक झाले तसेच गणेशमूर्ती समोर काढलेल्या रांगोळीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबियांशी संवाद साधला.