22.07.2025: सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासोबत संवाद

22.07.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सिक्कीम विद्यापीठ आणि भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडने ‘ऑपरेशन सद्भावना’ अंतर्गत आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता दौऱ्याचा भाग म्हणून राजभवन मुंबई येथे सिक्कीमच्या विविध गावांतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. भारतातील दुर्गम भागातील तरुण नागरिकांना विविध सांस्कृतिक अनुभवांशी जोडणे, सद्भावना वाढवणे आणि एकतेची भावना बळकट करणे हा या दौऱ्याचा मागचा उद्देश आहे. मेजर सृजन सिंह नेगी, मेजर आरती रावत तसेच सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.