22.05.2025: पंतप्रधानांनी दुरस्थ माध्यमाव्दारे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित परळ रेल्वे स्थानकासह देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले

22.05.2025: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित परळ रेल्वे स्थानकासह देशातील १०३ रेल्वे स्थानकांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत आज संपन्न झाला. यानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबईतील पुनर्विकसित परळ स्टेशन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिकानेर येथील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि निमंत्रित सहभागी झाले होते. परळ, मुंबई येथील कार्यक्रमात आमदार अजय चौधरी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीणा, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि आमंत्रित उपस्थित होते. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १५ पुनर्विकसित स्थानकांचा समावेश आहे.