22.04.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ राहुरी येथे संपन्न

22.04.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ राहुरी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला कृषी मंत्री तसेच विद्यापीठाचे प्र-कुलपती माणिकराव कोकाटे, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा शरद गडाख, राज्यातील विविध विद्यापीठांचे विद्यमान तसेच माजी कुलगुरु, विद्यापीठाच्या कार्यकारी आणि विद्वत परिषदेचे सदस्य उपस्थित होते. कुलगुरु प्रा. गडाख यांनी विद्यापीठ अहवाल वाचन केले तसेच विद्यापीठाच्या महत्वपूर्ण उपलब्धीची माहिती दिली. या पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांतील एकुण ५१८२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी गुणवत्ताप्राप्त स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले.