22.03.2025: राज्यपालांच्या हस्ते रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे प्रकाशन

22.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे राज भवन, मुंबई येथे प्रकाशन संपन्न झाले. ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी हा ‘हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ हा इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथ लिहिला आहे. प्रकाशन सोहळ्याला एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, आवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता, लेखक सचिन नंदा, एनएसईचे प्रमुख डॉ आशिषकुमार चौहान, रवींद्र संघवी, समीर कोपीकर, मिलिंद घुमरे आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.