22.03.2025: महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा

22.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे बिहार राज्य राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजभवनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहकार्याने बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिहारचे राज्यगीत व भोजपुरी गीत सादर केले तसेच मिथिला प्रदेशाचे लोकनृत्य झिझिया व जट-जटिन सादर केले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्यपालांचा सत्कार केला. कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.