22.03.2022:राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका’ चर्चासत्राचे उद्घा
22.03.2022: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व केंद्रीय हिंदी निदेशालयातर्फे आयोजित ‘राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका’ या विषयावरील ३-दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले. चर्चासत्राला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे अध्यक्ष भूषण पटवर्धन, ‘राष्ट्रधर्म’चे संपादक ओमप्रकाश पांडेय, श्री लाल बहादूर शास्त्रीय केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु मुरली मनोहर पाठक, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव तसेच चर्चासत्राचे निमंत्रक व संस्कृत विभागप्रमुख डॉ जितेंद्र कुमार तिवारी यांसह निमंत्रित, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.