22.02.2025 : उपराष्ट्रपती व राज्यपाल यांनी दिली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट

22.02.2025 : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा केली. त्यांच्या समवेत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, खासदार डॉ. भागवत कराड होते. मंदिर प्रशासनातर्फे उपराष्ट्रपती महोदयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपतींनी मंदिराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती घेतली.