22.02.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

22.02.2025: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. दीक्षांत समारंभाला डॉ. श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमांतर्गत उपराष्ट्रपती व राज्यपालांच्या हस्ते रोप लावण्यात आले.