21.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूर संस्कृत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ सपंन्न

21.12.2022 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा अकरावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी श्रीनिवास वरखेडी यांना त्यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि मराठी शाहिरी कविता यामध्ये संशोधनाकरिता विद्यावचस्पती (डी.लिट) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात संशोधनपर विद्यावाचस्पती (डी.लिट) तसेच १५ विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत विद्यावारिधी (पीएच.डी.) पदवीने राज्यपालांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. एकूण ४१ सुवर्ण पदकांसह १५ रोख पारितोषिके देखील यावेळी प्रदान करण्यात आली.