21.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते कांदिवली येथील महाविद्यालयाच्या एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन
21.12.2021: कांदिवली मुंबई येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक डॉ शोभना वासुदेवन व डॉ ए एम पुराणिक, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.