21.09.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता कार्यक्रम संपन्न
21.09.2024: आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचे सह जुहू चौपाटी येथे किनारा स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खा. रवींद्र वायकर, आ. अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण सचिव तन्मय कुमार, आदी उपस्थित होते.