21.08.2021: डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) राज्यपालांच्या हस्ते अनावरण
21.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) राजभवन येथे अनावरण केले. महाराष्ट्र ही कला, नृत्य, वादनकला व संस्कृतीची खाण असून डेल्फिक कौन्सिलच्या राज्य शाखेच्या माध्यमातून राज्याच्या कला, संस्कृती व सिनेमाला चालना मिळेल. कौन्सिलने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, नेशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष, अभिनेते परेश रावल व डेल्फिक कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी साहिल सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य डेल्फिक कौन्सिलचे सदस्य अभी मित्तल, सुरेश थोमस व सिने निर्माते अली अकबर सुलतान अहमद हे देखील यावेळी उपस्थित होते.