21.06.2026: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपालांचा योगसत्रात सहभाग
21.06.2026: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. आपल्या भाषणातून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या विविधांगी राष्ट्रकार्याचे कौतुक केले व सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल भारतीय तटरक्षक दलाचे अभिनंदन केले. यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे अतिरिक्त महासंचालक एम. व्ही. पाठक, पीटीएम, टीएम तसेच महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम यांनी राज्यपालांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. योगसत्राला तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय तसेच लोकभवनातील अधिकारी उपस्थित होते. कैवल्यधाम येथील योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग प्राणायाम सत्राचे संचालन केले.