21.05.2026: मुंबई येथे व्यापार परिषदे साठी आलेले सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडेस आपला मुंबई दौरा आटपून आज रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांना निरोप दिला.