21.03.2026: उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सपंन्न
21.03.2026: उपराष्ट्रपती झाल्यानंतर आपल्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांच्यासह विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तापुर्ण कामगिरी करणाऱ्या स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. लातूर, अहेरी व छत्रपती संभाजीनगर येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थाना ‘सर्वोत्तम आयटीआय’ पूरस्कार देण्यात आले. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयां मध्ये व्यसन मुक्ती साठी Say No To Drugs या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमत्र्यांनी विद्यापीठातर्फे आयोजित कौशल्य विकास प्रदर्शनाला यांनी भेट दिली.