21.03.2026: उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकभवन येथे जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन
21.03.2026: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे जैन दीक्षा महोत्सवाला उपस्थित राहून जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन केले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपराष्ट्रपतींनी जैन तीर्थंकर मुर्ती व प्राचीन जैन साहित्याच्या प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, श्री अध्यात्म परिवार ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त हितेंद्र मोता, विश्वस्त राजेश चंदन, विश्वस्त बाबुलाल भन्साळी उपस्थित होते.