21.02.2025: राज्यपालांची मुंबई येथील श्री तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालयास भेट

21.02.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी परळ मुंबई येथील श्री तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालयास भेट देऊन कॉर्पोरेट सहकार्यातून अद्ययावत करण्यात आलेल्या वर्गखोल्यांची पाहणी केली. ‘युवा अनस्टॉपेबल’ या अशासकीय संस्थेच्या पुढाकाराने शाळांच्या अद्ययावतीकरणाची मोहीम राबविण्यात आली. यावेळी राज्यपालांनी मुलांना परस्पर संवादी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या विज्ञान – तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या भेट दिली तसेच शाळेत नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधा आणि स्मार्ट वर्गखोल्यांची पाहणी केली. या प्रसंगी युवा अनस्टॉपेबलचे संस्थापक अमिताभ शहा, एचडीएफसी बँक ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या प्रमुख नुसरत पठाण, लेखक अमीश त्रिपाठी, पार्थ वसवडा (युवा अनस्टॉपेबल), कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते आणि युवा अनस्टॉपेबलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते टाटा कॅपिटल, बँक ऑफ अमेरिका, जीएसके, नोमुरा, कॅपजेमिनी, नुवामा, एचडीएफसी बँक, बजाज इलेक्ट्रिकल्स, येस बँक, फिनोलेक्स आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या योगदानाबद्दल ‘युवा कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.