21.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते मुंब्रा, कौसा येथील ४० करोना योद्धे सन्मानित
21.02.2021 : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या.