21.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांचा राज्य स्थापना दिवस संपन्न

21.01.2025 : महाराष्ट्र राजभवन येथे आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. एचएसएनसी विद्यापीठाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर केला. यावेळी तिन्ही राज्यांची ओळख करून देणाऱ्या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, कुलसचिव डॉ भगवान बालानी, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, एचएसएनसी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.