20.11.2023 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आज ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा अंतर्गत महाशिबीर संपन्न
20.11.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आज ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा अंतर्गत महाशिबीर संपन्न झाले. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लक्षित लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनांचे लाभ देण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार विनोद निकोले, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.