20.08.2021: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड द्वारा संचालित परफ्युमरी कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ संपन्न
20.08.2021: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड द्वारा संचालित परफ्युमरी कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी सुगंधी द्रव्य विषयक दोन वर्षांचा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या १७ दृष्टिहीन स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. ई. वायुनंदन, नॅबचे मानद सचिव सत्यकुमार सिंह, सीपीएल अॅरोमाज कंपनीचे महाव्यवस्थापक रणजीत अग्रवाल, नॅबच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम उपस्थित होते.