20.07.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न
20.07.2023: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डाॅ. विनय सहस्रबुद्धे यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका विजया येवले, कुलसचिव युवराज मलघे तसेच विविध विभागाचे प्रमुख, आजी – माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण १५४५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.