20.05.2023 : सिंगापूर इंटरनॅशनल स्कुलचा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

20.05.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी आमदार मनीषा चौधरी, आमदार पंकज भोयर, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शारोनी मल्लिक, प्राचार्य ग्रॅम कॅसलेक, आयबी प्रमुख अब्सोलोम मुसेवे, स्नातक विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते. सत्याण्णव विद्यार्थ्यांना यावेळी शाळांत आयबी डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.