20.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा

20.02.2025: राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाच्या सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यापीठाची माजी विद्यार्थीनी संजीवनी भेलांडे यांनी यावेळी अरुणाचल प्रदेशचे राज्यगीत सादर केले. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत यांसह सिडनहॅम महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जे जे स्कू ल ऑफ आर्टस च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान राज्यपालांचे तसेच इतर मान्यवरांचे पोर्ट्रेट्स काढून भेट दिले.