20.02.2024 : राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात
20.02.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.