20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
20.०3.२०20: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.