2८.०४.२०२०: न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ.
2८.०४.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना राजभवन येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.