19.11.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत जेबीएम समूहातर्फे पुणे येथे ‘सर्वोत्कर्ष’ कार्यक्रम संपन्न
19.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जेबीएम समूहातर्फे चाकण, पुणे येथे विविध कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांचा समावेश असलेला ‘सर्वोत्कर्ष’ कार्यक्रम संपन्न झाला. समूहाचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार आर्य यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांनी अहिल्यानगर येथे सुरु करण्यात आलेल्या स्वामी विरजानंद कन्या गुरुकुल संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. जेबीएम समूहाचे उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल, शासकीय अधिकारी तसेच समूहाचे सदस्य उपस्थित होते. ‘सर्वोत्कर्ष’ कार्यक्रमांतर्गत गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबिराचे आयोजन, व्हीलचेअरचे वाटप, आदी उपक्रम घेण्यात आले.