19.08.2023: राज्यपालांच्या हस्ते प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ लिखीत ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन

19.08.2023: सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.