19.08.2021: राज्यपालांच्या हस्ते हिंदी दैनिक ‘प्रवासी संदेश’च्या पाचव्या वार्षिक अंकाचे लोकार्पण
19.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हिंदी दैनिक ‘प्रवासी संदेश’च्या पाचव्या वार्षिक अंकाचे राजभवन येथे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, प्रवासी संदेशचे मुख्याधिकारी विनोद बडाला, संपादक अरुण उपाध्याय व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रमेश धाकड, चंदन भन्साळी, पंकज मिश्रा, कीर्ती तातेड, माधवजी चौधरी आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.