19.08.2021: न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ
19.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांना लोकायुक्त पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.