19.08.2021: नवाझ मोदी सिंघानिया, शायना एनसी यांसह ५० करोना योद्धे सन्मानित
19.08.2021: करोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० करोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. जय फाऊंडेशन व रुद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, महाराणा प्रताप महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह ठाकूर तसेच जय फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया प्रामुख्याने उपस्थित होते.