19.02.2023: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली

19.02.2023: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव महेश गोलानी, सहसचिव श्वेता सिंघल व डॉ. प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.