19.02.2021 : शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन
19.02.2021 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महापौर किशोरी पेडणेकर खासदार अरविंद सावंत, उपमहापौर सुहास वाडकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, किसन जाधव, माजी महापौर महादेव देवळेकर, श्रद्धा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.