19.02.2021: कांदिवली येथील आधारिका समाज विकास संस्थेला राज्यपालांची भेट
19.02.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महावीर नगर कांदिवली येथील आधारिका समाज विकास संस्थेला भेट देऊन तेथील महिलांच्या कौशल्य प्रशिक्षण व उद्यमशीलता केंद्राची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आधारिका समाज विकास संस्थेच्या संचालिका रुची माने, नगर सेविका बिना दोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ रन्ना दोशी उपस्थित होते.