19.01.2022: मुंबई हिंदी सभेच्या अमृत महोत्सवाचे राज्यपालांच्या उपस्थितीत उदघाटन
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/tdxgTzPE1AA/mqdefault.jpg)
19.01.2022 : महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सन १९४४ साली सुरु झालेल्या मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला. कार्यक्रमाला मुंबई हिंदी सभेचे कुलपती तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय हिंदी संचालनालयातील उपसंचालक राकेश शर्मा, पत्रकार वर्षा सोळंकी, सभेचे कुलगुरु विजय परदेशी, महासचिव सूर्यकांत नागवेकर व कोषाध्यक्ष देवदत्त साळवी प्रामुख्याने उपस्थित होते.