19.01.2021 : पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

19.01.2021 : पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.