19.01.2021 : एफटीआयआय हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त साकारण्यात आलेल्या धातुकला शिल्पाचे अनावरण

19.01.2021 : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भुपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदि उपस्थित होते. तसेच संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी व मान्यवर दुरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.