18.12.2021: अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या उद्योग संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
18.12.2021: अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले भोजन देण्यात सहकार्य करणाऱ्या विविध दानशूर उद्योग संस्था, कंपनी व अन्न वितरण संस्थांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, अन्नामृत फाउंडेशनचे संस्थापक व मुख्याधिकारी राधा कृष्ण दास, विश्वस्त कुशल देसाई व नुपूर देसाई प्रामुख्याने उपस्थित होते.