18.11.2025: राज्यपालांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात नैसर्गिक कृषी परिषदेला संबोधित केले
18.11.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज पुणे येथील कृषी महाविद्यालय येथे आयोजित नैसर्गिक कृषी परिषदेला संबोधित केले. नैसर्गिक कृषी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.,राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी विभागाचे अधिकारी, राज्य आणि गुजरात येथील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्राच्या कृषी विभागांतर्गत विविध कार्यालयांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषी सल्लागार, कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.