18.11.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे येथे आठवा निसर्गोपचार दिन साजरा
18.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडी येथील निसर्गग्राम येथे आठवा निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला. यावेळी निसर्गोपचाराशी संबंधित पुस्तकांचे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांच्या विजेत्या महाविद्यालय, वैद्यकीय व्यवसायी, उत्कृष्ट विद्यार्थी यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग आदी उपस्थित होते. राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, निसर्ग ग्राम येथील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह निसर्गोपचार वैद्यकीय व्यवसायी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.