18.07.2026: श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल अंधेरी मुंबई येथून आरंभ
18.07.2026: इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल अंधेरी मुंबई येथून आरंभ झाला. यावेळी राज्यपालांनी रथावर आरूढ झालेल्या श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडूने स्वच्छ केले. रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे. या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ भक्तांच्या भेटीसाठी बाहेर येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी येथे तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला असे यावेळी राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार हेमा मालिनी, आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ सूरदास, इस्कॉन जुहूच्या अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.