18.07.2025: राज्यपालांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील इस्कॉन मंदिराला भेट

18.07.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी मंदिर समितीच्या गोविंदाज या उपहारगृहाला देखील भेट दिली. यावेळी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, इस्कॉन चौपाटी मंदिराचे अध्यक्ष गौरांग दास, राष्ट्रीय शेअर बाजारचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. रामामूर्ती, गोवर्धन इकोव्हिलेजचे सल्लागार रमा सिंह दुर्गवंशी, प्रकल्प प्रमुख नवलजीत कपूर, जननिवास प्रभू तसेच मंदिर समितीचे सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.